निंभोर्‍यात स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटप

0

निंभोरा : निंभोरा येथील विविध कार्यकारी सोसायटी व स्टेशन परीसर येथील रेशन दुकानात व बगाडे यांच्या रेशन दुकानातून शासनाकडून नियमित येणारे धान्य व मोफत धान्य वाटपाला सुरुवात झाली. प्रसंगी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पत्रकारांसह दुकानदार आदीची उपस्थिती होती. निंभोरा येथे रेशन दुकानांवर सरपंच डिगंबर चौधरी, कमलाकर पवार, राजु बोरसे, बगाडे, गजरे, तलाठी समीर तडवी, ग्रामविकास अधिकारी व प्रभाकर सोनवणे उपस्थित होते. रेशन दुकानांवर ग्रामस्थांची गर्दी होऊ नये म्हणून बॅरीकेटस् बसविण्यात आले.

Copy