निंभोर्‍यात विनाकारण फिरणार्‍यासह पाचशे रुपयांच्या दंडासह ऊठ बशांची शिक्षा

0

 

निंभोरा बु.॥ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू असून प्रशासनाने नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केल्यानंतरही काही लोक विनाकारण बाहेर फिरून प्रशासनाचा ताण वाढत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह दंडात्मक कारवाया केल्या जात आहे. निंभोरा येथे एक जण अशाच पद्धत्तीने बाहेर फिरत असताना प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या नजरेस पडल्याने त्यास पाचशे रुपये दंडासह ऊठबशा काढण्याची शिक्षा सुनावण्यात आली. या कारवाईने गावात चांगलीच खळबळ उडाली.

Copy