निंभोर्‍यात फळ बागायतदार शेतकरी मंडळाकडून गरीबांना मदत

0

निंभोरा बु.॥ : निंभोरा फळ बागायतदार शेतकरी मंडळाकडून गरीबांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला जात आहे. या उपक्रमाबद्दल फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी समाधान व्यक्त केले. निंभोरा स्टेशन येथे फळ बागायतदार मंडळातर्फे गरीबांना अन्न, धान्य, किराणा वस्तुंची किट वाटप प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष कडू चौधरी, उपाध्यक्ष मोहन पाटील, ऑ.सेक्रेटरी गणेश पाटिल, खजिनदार मनोहर चौधरी, संचालक किरण नेमाडे, विजय महाजन, विनोद पाटील, राजीव बोरसे, उपसरपंच सुभाष पाटील,स चिन चौधरी, भूषण चौधरी, किशोर चौधरी, सर्कल अधिकारी सचिन पाटील, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, सुनील कोंडे, आशिष बोरसे, योगेश सोनवणे, तलाठी समीर तडवी, सुरेश बोरनारे, नदीम शेख, कोतवाल प्रभाकर कोळी, पीतांबर फालक, दिलीप पाटील, राहुल महाले आदी मान्यवर उपस्थित होते. आभार राजीव बोरसे यांनी मानले.