निंभोर्‍यातील नितेश महाजनचे नियतकालिक स्पर्धेत यश

0

निंभोरा : येथील नितेश रघुनाथ महाजन या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने आंतरमहाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत उत्कृष्ट संशोधन लेखनामधे प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादित केले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी कल्याण विभागाने 29 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर करण्यात आला होता.‘पैसिव इथुनसीआ अँड रैशनल थॉट ऑन अरुणा शानबाग केस’ या विषयावर संशोधन लेखन केले होते. त्याच्या या यशाबद्दल एस.एस. मनियार विधि महाविद्यालयाचे प्राचार्य बी.युवा कुमार रेड्डी, प्राध्यापक गणपत धुमाळे, रेखा पहूजा, विजेता सिंग, अंजली बोंदर, योगेश महाजन, दीपक क्षीरसागर आदी प्राध्यापकांकडून कौतुक होत आहे. निंभोरा येथील पशुवैद्यक रघुनाथ महाजन यांचे ते चिरंजीव आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.