निंभोरा सेंट्रल बँक चोरी प्रकरणातील संशयीत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

निंभोरा। सेंट्रल बँकेच्या निंभोरा शाखेतील बँकेच्या मागील बाजूच्या एसी रुमची खिडकी तोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न करतांनाचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात टिपले गेल्याने हा महत्वाचा धागा धरुन निंभोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत निंभोरा येथीलच संशयित आरोपी दिपक शरद भंगाळे याच्या विरुध्द शाखा व्यावस्थापक एम.एच. लवंगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष घटणास्थळी जावून पोलिसांनी पाहणी केली असता आरोपी निष्पन्न करणेकामी सीसीटीव्ही फुटेज गोपनीय पडताळणी करुन निंभोरा पोलिसांनी आरोपी दिपक यास 24 तासाच्या आत जेरबंद केले. वरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागिय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश वराडे, राजू कुमावत, ज्ञानेश्वर पाटील, मोहम्मद तडवी, मेहमुद शहा, ईश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, जितेद्र जैन हे करीत आहे. वरील प्रकरणात सेंट्रल बँकेचे नाशिक येथील वरीष्ठ अधिकारी अशोक लाठे यांनी चोरीप्रकरणी विशेष लक्ष दिले.