निंभोरा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

0

निंभोरा : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पेन व वहीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद बोंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डिगंबर चौधरी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष दिपक पाटील, सुनिल कोंडे, महेबूब मन्सुरी, मोहन बोंडे, शंकर बोरोले, रविंद्र ठाकरे, शेख इकबाल, शेख कलीम, रतन वाघ, गिरीश नेहेते, गुणवंत भंगाळे, सुधिर मोरे, सचिन चौधरी, विजय सोनार, आरिफ खान, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अशोक दोडके, नितीन दोडके, प्रा. संजय मोरे, शेख फरिद, संदिप कोळी, युनुस खान, राकेश कोळी, जितेंद्र कोळी, प्रशांत पाटील, राहुल सोनार, राहुल मोरे, दिपक मोरे, निलेश लोखंडे, विशाल तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत व कृषी विद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजीव बोरसे यांनी तर आभार विशाल तायडे यांनी मानले. याव्यतिरिक्त निंभोरा ग्रामपंचायत व कृषी विद्यालय तसेच तसेच स्टेशन परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.