निंभोरा परीसरात अवैध धंद्याविरोधात वॉश आऊट मोहिम

खिर्डी : निंभोरासह बलवाडी, आंदलवाडीसह खिर्डी, ऐनपूर परीसरात निंभोरा पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली. निंभोर्‍यातून 50 लीटर गावठी दारू तसेच बलवाडीतून दोन हजार 400 रुपये किंमतीची गावठी तसेच आंदलवाडी गावातून दोन हजार पाचशे रुपयांची 50 लीटर गावठी दारू व खिर्डी बु.॥ गावातून देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली व खिर्डीतून मटका जुगाराचे साहित्यासह 260 रुपयांची रोकडसह ऐनपूरातून एक हजार 220 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एकूण 60 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. ही कारवाई सहा.निरीक्षक स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, रा.का.पाटील, हवालदार विकास कोल्हे, नाईक ईश्वर चव्हाण, हवालदार अब्बास तडवी, एएसआय अन्वर तडवी, राकेश वराडे, सादीक शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Copy