नाहाटा महाविद्यालयात 25 रोजी संगीत विषयावर कार्यशाळा

0

भुसावळ । ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालित भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील संगीत विभागातर्फे एक दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा दोन सत्रात असून सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे तर प्रथम सत्रात सुगम संगीत एक अभ्यास विषयावर पुणे येथील प्रा. श्रीमती अनुराधा मराठे या मार्गदर्शन करणार आहे. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे या उपस्थित राहतील तर दुपारी 4 च्या द्वितीय सत्रात सुगम सांगितेत सादरीकरण व विवेचन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे . त्यानंतर समारोप व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

संगीत कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 22 फेब्रुवारी पर्यंत सहभागी होणार्‍यांनी प्रा. उत्कर्षा साठे व राजेश पुराणिक यांचेशी संपर्क साधावा वा अर्ज पाठवावेत. कार्यशाळेत सहभागी प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नाहाटा महाविद्यालयातील कक्ष येथे आयोजित कार्यशाळेत संगीत विषयाची आवड असणारे विद्यार्थी तसेच संगीत विषयाचे शिक्षक, प्राध्यापक सहभागी होऊ शकतील. जास्तीत जास्त संख्येने सह्भागे होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.