नाहाटा महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन

0

भुसावळ- कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती सभेंतर्गत विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग आणि भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी होते. उद्घाटन विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरेे यांच्या हस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.के.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी वक्ते एन.एन.लांडगे यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्त्व’ या विषयावर तसेच डॉ.प्राजक्ता महाले यांनी ‘आरोग्य आणि आहार’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. डॉ.रुपाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले र डॉ.के.ए.वारके यांनी आभार मानले. डॉ.स्मिता चौधरी, प्रा.डॉ.पी.ए.आहिरे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Copy