नाशिक येथून उत्तरप्रदेशात जाणार्‍या मजुरांचा ट्रक पकडला

0

जळगाव – परराज्यात जाण्याची कुठलीही परवानगीची पास नसतांना नाशिक येथून उत्तरप्रदेशात जाणार्‍या मजुरांचा ट्रक जिल्हापेठ पोलिसांनी रविवारी प्रभात चौकात पकडला. खबरदारी म्हणून ट्रक मधील सर्व 4 मजुरांना कोव्हीड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांनी दिली..

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरिक्षक तसेच कर्मचारी महामार्गावर गस्त घालत होते. यादरम्यान एका ट्रकमध्ये काही जण प्रवास करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पाठलाग करुन पोलिसांनी ट्रक थांबविला. तपासणी केली असता, त्यात 45 नागरिक आढळून आले. चौकशी केली असता ते नाशिक येथून उत्तरप्रदेशात जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खबरदारी म्हणनूपोलिासंनी त्यांना तातडीने तपासणीकामी कोरोना रुग्णालयात दाखल केले. त्यांना त्याठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले असून ट्रकचालकावर संचारबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Copy