नाशिक पोलिसांना वॉण्टेड आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- नाशिक रोड पोलिसांना भादंवि 307 च्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी फिरोज नासीर बागवान (38. रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) हा गुन्ह्यानंतर पसार झाल्याने त्याचा शोध सुरू असताना तो मुस्लीम कॉलनीतील घरी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या कलमान्वये नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, पोलिस नाईक यासीन पिजारी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, किशोर महाजन आदींनी केली. आरोपीला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आरोपी फिरोजच्या मुसक्या आवळल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ईरफान शेख (नाशिक रोड) हा नाशिक रोड पोलिसांना शरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली.