नाशिकहून दुचाकीने चिंचोली गाठले अन् शेतातील विहिरीत तरुणाने केली आत्महत्या

3

जळगाव : नाशिक येथून दुचाकीने जळगाव तालुक्यातील चिंचोली गाव गाठले. यानंतर चिंचोली शिवारातील शेतात रितेश राजेंद्र लाडवजारी वय 21 रा श्रमिक नगर, नाशिक या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. दरम्यान घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू मिळून आला असून या चाकूने रितेशने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या शक्यतेसोबत घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात आला. मात्र यानंतर पोलिसांच्या तपासात रितेशने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिक दुचाकी जळगाव गाठून चिंचोली याचठिकाणी त्याने आत्महत्या का केली, यासह अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

दुचाकी अन् विहिरीच्या काठावर चप्पल दिसली
राजेंद्र लाडवजारी हे पत्नी व मुलगा रितेश यांच्यासह नाशिकमध्ये श्रमिक नगरात वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरुवारी त्यांचा मुलगा रितेश हा दुचाकी (क्रमांक एम एच पंधरा एफ जी 3093) ही घेऊन नाशिक हुन चिंचोली (जळगाव) कडे आला. रितेशचे नातेवाईक ललीत भास्कर घुगे हे चिंचोली येथे राहतात. ललीत घुगे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात आले असता त्यांना नाशिक येथील मावसभाऊ रितेश याची दुचाकी उभी दिसली. रितेशचा शोध घेतला, शेतातील विहिरीच्या काठावर रितेशची चप्पल दिसली. मात्र रितेश कुठलेही दिसून आला नाही. अखेर ललीत घुगे यांनी रितेशचे मुक्ताईनगर येथील मामा राजेंद्र शंकर पालवे यांना फोन करुन प्रकार कळविला.

मामाने भाचा रितेशची पटविली ओळख
रितेशचे राजेंद्र शंकर पालवे सकाळी दहा वाजता चिंचोली येथे पोहोचले. याबाबतची माहिती मिळाल्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संदीप हजारे, हेड कान्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अतुल पाटील, किशोर बडगुजर, दीपक चौधरी, भूषण सोनार, तसेच चिंचोलीचे पोलीस पाटील मुकेश पोळ यांनी या ठिकाणी धाव घेतली. काही तरुणांनी विहिरीत शोध घेतला तरुणाचा मृतेदह मिळून आला. विहिरीतून बाहेर काढले असता राजेंद्र पालवे यांनी मयत हा त्यांचा भाचा रितेश हाच असल्याची ओळख पट
विली.

रक्ताने माखलेल्या चाकूने संभ्रम
सूत्रांच्या माहितीनुसार रितेश हा नाशिकहून थेट चिंचोली येथे ललीत घुगे यांच्या शेतात आला. याठिकाणी त्याने चाकूने डाव्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रक्ताने माखलेला चाकू घटनास्थळी मिळाल्याने घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. परंतु आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. रितेशने आत्महत्येपूर्वी त्यांच्या आई व वडील यांचे एका कागदावर संपर्क क्रमांक लिहलेले होते. दुचाकी ठेवलेला हा कागद पोलिसांनी आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Copy