Private Advt

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचा अपघात ; 10 कर्मचार्‍यांचे नोंदवले जबाब

रेल्वे सेफ्टी कमिशनर भुसावळ शहरात दाखल

भुसावळ : नाशिकजवळील लहावीत स्थानकाजवळ डाउन पवन एक्स्प्रेसचा अपघात घडल्याची घटना रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात 11 रेल्वे डबे रेल्वे रूळावरून घसरल्यानंतर वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सीआरएस (रेल्वे सेफ्टी कमिशनर) यांच्याकडून सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यातील चौकशी मंगळवारी भुसावळ डीआरएम कार्यालयात करण्यात आली. त्यात 10 अधिकारी, कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवण्यात आले.

सेप्टी कमिश्नर भुसावळात
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लहावीत-देवळाली स्थानकादरम्यान पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रुळांवरून घसरल्याने घटना रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी 3.10 वाजता घडली होती. या अपघाताची सीआरएस मनोज अरोरा यांनी चौकशी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक येथे चौकशी झाली. त्यात 15 जणांचे जबाब नोंदवले गेले. नंतर मंगळवारी भुसावळ डीआरएम कार्यालयात आयुक्तांनी रेल्वे अधिकारी, कर्मचारी मिळून 10 जणांचे जबाब घेतले. यावेळी डीआरएम एस.एस.केडिया व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.