Private Advt

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : आठ रेल्वे गाड्या रद्द : चार गाड्यांचे मार्ग बदलले

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीट रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने रविवारी मुंबईतून सुटणार्‍या आठ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत तर चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सिकंदराबाद-मुंबई ही गाडी शॉट टर्मिनेट करण्यात आली असून नागरसोल येथेच थांबविण्यात आली आहे.

या रेल्वे गाड्या रद्द
गाडी क्रमांक 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस (3 रोजी सुटणारी), 12146 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (5 रोजी सुटणारी), 12111 मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (3 रोजी सुटणारी), 12112 अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (3 रोजी सुटणारी), 12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस (3 रोजी सुटणारी), 17057 मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस (3 रोजी सुटणारी), 17612 मुंबई-नांदेड एक्सप्रेस, 17611 नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (4 रोजी सुटणारी) रद्द करण्यात आली आहे तर 17617 नांदेड-मुंबई एक्स्प्रेस व मुंबई-मनमाड एक्स्प्रेस 4 रोजी रद्द करण्यात आली आहेत.

3 रोजी धावणार्‍या या गाड्या वळवल्या
गाडी क्रमांक 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर एक्सप्रेस वसई रोड-सुरत- जळगाव (पुढे योग्य मार्गाने) मार्गाने वळवण्यात आली तर 12809 मुंबई-हावडा एक्सप्रेस कल्याण-लोणावळा-पुणे-दौंड-मनमाड येथून वळवण्यात आली. 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल एक्सप्रेस वसई रोड, नागदा, मुक्तसर, भोपाळमार्गे वळवण्यात आली तसेच 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस दौंड-मनमाड येथून वळवण्यात आली असून – 13202 मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटणा एक्सप्रेस दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे.

या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस 4 रोजी नगरसोल येथे शॉर्ट टर्मिनेटेड आणि खाली दिशेने विशेष ट्रेन म्हणून परतेल तर 17058 सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस 3 रोजी प्रस्थान स्टेशन नगरसोल येथे शॉर्ट टर्मिनेट झाली व नांदेडला परतली. 12106 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस 3 रोजी भुसावळ येथे शॉर्ट टर्मिनेट होवून 12105 मार्गावर विशेष ट्रेन म्हणून कामावर परत आली. 17618 नांदेड-मुंबई एक्सप्रेस 3 रोजी मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आली.