‘नाळ’ने पहिल्याच आठवड्यात केली १४ कोटींची कमाई

0

मुंबई : ‘सैराट’च्या यशानंतर नागराज मंजुळे काय घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. आता प्रेक्षकांसाठी नागराजने ‘नाळ’ हा चित्रपट आनला आहे. आई आणि मुलगा यांच्यातील भावविश्व प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या ‘नाळ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने तब्बल १४ कोटींची दमदार कमाई केली आहे. ‘नाळ’ मधील ‘जाऊ दे नं वं’ या गाण्याने तर सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घातला. नागराज मंजुळे यांनीच या चित्रपटातील संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यांनी केले आहे.

Copy