नालासोपारा स्फोटकेप्रकरणी साकळीतील आरोपींना 9 पर्यंत कोठडी

0

भुसावळ- नालासोपारा स्फोटके प्रकरणी साकळी येथून ताब्यात घेण्यात आलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी यांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 9 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नालासोपारा स्फोटके प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक केली आहे. तर 6 सप्टेंबररोजी एटीएसने साकळी येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि 7 सप्टेंबरला विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी यास ताब्यात घेतले होते. त्यांना चौकशी अंती 8 सप्टेंबरला रात्री उशीरा अटक करण्यात आली तर 9 सप्टेंबर रोजी मुबंई न्यायालयाने दोघांना 17 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती व पुन्हा त्यांना 25 सप्टेंबरपर्यंत 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या आरोपींना मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणार्‍या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याच्या आरोपाखाली एटीएसने अटक केली आहे तर साकळीतील आरोपींनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावल्याचा एटीएसला दाट संशय आहे.

कर्नाटक पोलिसही घेणार आरोपींना ताब्यात
कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी साकळीतील दोघा आरोपींचा कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेण्यात येणार असून न्यायालयाने याबाबत अद्याप निर्णय दिला नसल्याचे सूत्रांकडून समजते.

Copy