नारायण राणे बेरोजगार राजकारणी; गुलाबराव पाटीलांची जहरी टीका

0

जळगाव: माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार नारायण राणे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील त्यांनी सरकारला लक्ष केले आहे. नाणार प्रकल्पावरून देखील त्यांनी शिवसेनेला लक्ष केले होते. दरम्यान राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे यांच्यावर पलटवार केला आहे. नारायण राणे हे सुरक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही काम राहिलेले नाही. त्यामुळे ते सातत्याने सरकारवर टीका करत राहतात अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. जळगावात ते पत्रकारांशी बोलत होते. राणे यांनी नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा राजकीय विषय बनला आहे असे आरोप राणे यांनी केला आहे.

राणे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी कोकणासाठी काहीही केलेले नाही. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी ते दुसऱ्यांवर आरोप करत राहतात असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यात आल्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू शकतात, मात्र जनतेच्या मनातील राज्याची प्रतिमा ते हटवू शकत नाही,

Copy