नारायण राणे-रावल भेट! राजकीय चर्चांना उधाण

0

अमरावती । नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या राजकीय भूमिकेबाबत अद्याप संभ्रम असतानाच आज भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी राणेंची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र रावल आणि आपले कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो. काही झाले तरी मी भाजपात जाणार नाही. तसेच 4 एप्रिलला काँग्रेसच्या संघर्ष यात्रेतही सहभागी होणार असल्याचे सांगत नारायण राणे यांनी पक्षांतराच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

नितेश राणे यांनी पक्ष न सोडल्याचा केला होता खुलासा
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू होत्या. भाजपा नेत्यांनीही राणेच्या पक्षप्रवेशाबाबत सकारात्मक वक्तव्ये केल्याने तसेच राणेही काँग्रेसवर कठोर शब्दात प्रहार करत असल्याने राणे लवकरच भाजपावासी होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. राणेचे पुत्र नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राणेंच्या पक्षांतराच्या बातम्या थंडावल्या. पण आज राणे आणि रावल यांच्यात भेट झाल्याने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र स्वत: राणेंनीच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त स्पष्ट शब्दात फेटाळले