नारायणनगरमध्ये खुल्या जागेवर पेटला वणवा

0

भुसावळ । शहरातील नारायणनगर परिसरात असलेल्या खुल्या भुखंडावर कुणीतरी जाळलेला कचरा टाकल्यामुळे यातून बाजूस असलेल्या सुकलेेल्या गवताने पेट घेवून संपूर्ण मैदानावर वणवा पेटला. परिसरात धुराचे लोट दिसताच नागरिकांनी पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून अग्निशमक दलास पाचारण करण्यात आले असता अग्निशमक दलाचे दोन बंब मागवून आग विझविली.

जाळलेल्या कचर्‍याने लागली आग
नारायणनगर येथे खुल्या भुखंडावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडेझुडपे व गवत वाढले आहे. या ठिकाणी परिसरातील नागरीक घरातील कचरा आणून टाकतात. दुपारी 5 वाजेच्या सुमारास कुणीतरी जाळलेला कचरा याठिकाणी आणून टाकल्याने जागेवरील वाळलेल्या गवताने पेट घेत संपूर्ण मैदानावर आगीने रौद्र रुप धारण केले होते. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरताच नागरिकांनी एकच धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरसेवक पिंटू कोठारी यांनी अग्निशमन दलास पाचारण करुन आग विझविण्यात यश मिळाले.