नाराजीनाट्य : सेनेचे तीन आमदार परतले

मुंबई (खास प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदार यांनी बंड केल्यानंतर 30 ते 35 आमदार सुरतमध्ये दाखल झाले होते. मंगळवारी दिवसभर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सेनेचे तीन आमदार परतल्याची माहिती आहे. आमदार नितीन देशमुख, आमदार प्रकाश आबीतकर व आमदार बालाजी कल्याणकर अशी परतलेल्या आमदारांची नावे आहेत.

प्रत्यक्षात 10 ते 12 आमदार सोबत
शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा असतानाच मंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार सुरतमध्ये दाखल झाल्याने मंगळवारी सरकार कोसळण्याच्या चर्चा रंगल्या होत्या तर 30 ते 35 आमदार मंत्री शिंदे यांच्या सोबत असल्याचा दावाही केला जात असताना प्रत्यक्षात मात्र 10 ते 12 आमदारच सोबत असल्याची बाबही समोर आली आल्याचे बोलले जात आहे.