नायब तहसीलदाराला घोटी टोलनाक्यावर लुटले

0

जळगाव । मुंबईला जाणार्‍या जळगावचे नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांना घोटी टोल नाक्यावर विश्रांतीसाठी थांबले असतांना, अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेत वाहनातील रोख रक्कमेसह महागडे मोबाईल असा 52 हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव येथील नायब तहसीलदार विकास प्रल्हाद लाडवंजारी हे आपल्या खासगी कामासाठी दोन मित्रांसह जळगावहून मुंबईला होते. मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास थकल्याने घोटी टोल नाक्यावर थांबले.रस्तालगत वाहन उभे करून ते वाहनातच झोपले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी वाहनात प्रवेश करून विकास लाडवंजारी, रविद्र भावसार, किरण लोहार याच्या खिशातून रोख रक्कम, मोबाईल असा 52 हजार रुपयांचा मुद्देमाल ंपास केला.