Private Advt

नायगावात अल्पवयीन बालकाची गळफास घेत आत्महत्या

यावल : तालुक्यातील नायगाव येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता सुजल रमन तडवी असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
नायगाव, ता.यावल येथील रहिवासी रमन रुबाब तडवी यांचा मुलगा सुजल रमन तडवी हा शुक्रवारी दुपारी गावात असलेल्या गुरांच्या गोठ्यात गेला असता सायंकाळ होवूनही घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता गोठ्यातील पत्र्याच्या शेडच्या अँगलला दोरीने त्याने गळफास घेतल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठीआणण्यात आला येथे डॉ.अक्षय लाडगे यांनी शवविच्छेदन केले. यावल पोलिसात रमन तडवी यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुजजने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र लक्ष्मण खैरनार, सहा.फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.