नायगावातील 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या

यावल : तालुक्यातील नायगाव येथील मिलिंद उर्फ भिकन गलु कोळी (28) या अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. बुधवार, 15 रोजी सकाळी ही घटना घडली. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत मिलिंद कोळी या तरुणाची लहान भाऊ शेतात गेल्यानंतर आई-वडिल गावात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी बुधवारी सकाळी गेल्यानंतर तरुणाने गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. यावल पोलिसात चंद्रकांत कोळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, शामकांत धनगर, विजय परदेशी करीत आहेत. मयताच्या पश्चात म्हातारी आजी, आई, वडील, लहान भाऊ असा परीवार आहे.

Copy