नामांतराच्या विषयावर अजित पवारांचे भाष्य; मार्ग काढण्याचा विश्वास

0

मुंबई: औरंबादच्या संभाजीनगर नामकरणावरून महाविकास आघाडीत दुमत असल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेने नामकरणाची भूमिका कायम ठेवलेली असताना कॉंग्रेसने मात्र याला विरोध केला आहे. कॉंग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला आहे. दरम्यान त्यातच औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज नामकरण करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव झाल्याचे सीएमओच्या ट्वीटवरून सांगण्यात आले आहे. यावरून महाविकास आघाडीतील दुमत उघड झाले आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. नामांतराच्या विषयवार महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत, त्यातून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे अजित पवारांनी म्हटले आहे. आज माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर कामगिरी करते आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये दुमत नाही असेही त्यांनी सांगितले.