नामशेष झालेला चिता 70 वर्षानंतर भारतात दिसणार

Darshan of cheetah will happen in India after 70 years of Waiting नवी दिल्ली : भारतातून चित्ता नामशेष झाल्यानंतर त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे. सुमारे 70 वर्षानंतर भारतात चित्ताचे आगमन होत आहे. नामिबियातून त्याला विशेष बोईंग विमानातून आणून शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो येथे सोडण्यात येईल. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील.

विशेष विमानाची निर्मिती
या मोहिमेबद्रल प्रोजेक्ट चित्ता प्रमुख एस.पी.यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामिबियातील चित्ते बोईंग 747 म्हणजेच जंबो जेटने भारतात येतील. चित्ता थेट भारतात यावेत यासाठी विशेष जंबो जेटचेी निर्मिती करण्यात आली असून नामिबियाहून ते शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता भारताकडे उड्डाण करेल. नामिबियातील भारताच्या उच्चायुक्तांनी हा फोटो पोस्ट केला आहे. हे जंबो जेट खास प्रोजेक्ट चित्तासाठी तयार करण्यात आले आहे. नामिबियाहून ते शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता भारताकडे उड्डाण करेल. नामिबियातील भारताच्या उच्चायुक्तांनी हा फोटो पोस्ट केला. विशेष विमानात आठ चित्त्यांसह क्रू, वन्यजीव तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, नामिबियातील भारताचे उच्चायुक्त उपस्थित असतील. याशिवाय चित्ता एक्स्पर्ट लॉरी मार्कर त्यांच्या 3 जीवशास्त्रज्ञांसह उपस्थिती असेल.

कुनोत उद्या दाखल होणार चित्ते
चित्त्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विशेष क्रेट असतील. हे लाकडापासून बनवले जातील. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता चित्ते नामिबियाहून निघून 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कुनो येथे पोहोचणार असून चित्त्यांना मॉनिटरिंगसाठी सॅटेलाइट रेडिओ कॉलर बसवण्यात आल्याने त्यांचे स्थान कळणार आहे. दरम्यान, पीएम मोदी कुनोमध्ये 3 चित्ते सोडणतील तर उर्वरित चित्ते नंतर त्यांच्याच भागात सोडण्यात येतील.