नामफलकाचे आमदारांच्या हस्ते अनावरण

0

वाढदिवसानिमित्त राबविले विविध उपक्रम

पिंपरी : भोसरीतील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती अशा 20 कॉलनीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्त मिटाईचे वाटप करण्यात आले. तसेच दिनदर्शिकेचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे म्हणाले की, दिनदर्शिकेचा उपयोग प्रत्येक घरांमध्ये होत असतो. त्यामुळे ही दिनदर्शिका नागरिकांना उपयुक्त ठरणारी आहे. नागरिकांचा प्रमुख असणारी ही दिनदर्शिका नागरिकांना मोलाची माहिती देणारी आहे. यावेळी नगरसेवक सागर गवळी, उद्योजक देवेंद्र देवकर, माजी सैनिक भानुदास सरतापे, पांडुरंग गवळी, अनिल लांडगे, भानुदास लांडगे, सोमनाथ देवकर, अशोक देवकर, तुकाराम देवकर, संतोष तापकीर, तुषार फुगे, विशाल मुव्हे, शिवाजी फुगे, सुरज पाचर्णे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवनानिमित्त मिठाईचे वाटप

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठदिवसांपासून विविध लोकोपयोगी कार्यक्रम सुरु आहेत. भोसरीतील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती अशा 20 कॉलनीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच दिनदर्शिकेचे देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र देवकर यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर, नगरसेवक सागर गवळी यांनी आभार मानले.

Copy