नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ उतरले गृहराज्यमंत्री !

0
मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ बॉलीवूडसह राजकीय नेते देखील उतरू लागले आहेत. पाटेकर केवळ एक अभिनेताच नाहीतर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. कायदेशीर तक्रार नोंदवल्याशिवाय त्यांच्यावर असे आरोप करता येणार नाहीत, असे वक्तव्य गृहराज्यमंत्री दिपक केसकर यांनी केले आहे.
केसकर म्हणाले कि, तनुश्रीचा कोणासोबत तरी वैयक्तिक वाद होता. या वादातूनच हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी तनुश्रीवर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्रीला सुरक्षा न देता दुसऱ्या घडलेल्या काही घटनांच्या विरोधात सुरक्षा देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Copy