नाथाभाऊंना महावितरणचा झटका; पाठविले १ लाखांचे लाईटबिल

0

जळगाव: लॉकडाऊननंतर आलेल्या लाईटबिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना वीजबिलाने शॉक दिले आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेत्यांनाही लाईटबिल हातात पडताच झटका बसला आहे. भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही महावितरणने लाईटबिलचा झटका दिला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचे लाईटबिल आले आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे हे लाईटबिल आहे. लाईटबिल पाहून एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महावितरणने सामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये आवाहनही खडसे यांनी केले आहे. अवास्तव लाईटबिल सामान्यनागरिक त्रस्त आहे. शासनाने याची चौकशी करून लाईटबिलात सूट द्यावी अशी मागणी होत आहे. विरोधी पक्षाने देखील सरकारला यावरून लक्ष केले आहे. या प्रकरणी न्यायलयात देखील दाद मागण्यात आली आहे.