नाथाभाऊंच्या नेतृत्वावर विश्‍वास : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अनेकांचा भाजपात प्रवेश

0

मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची विकास काम करण्याची दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवत मुक्ताईनगर तालुक्यातील रामगढ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणार्‍यांमध्ये मोतिसिंग शेळके, लोताबाई भील, गजराबाई भील, भीमा भील, लोट्या भील, सुरा भील, भोगोसिंग भील, भीमसिंग भील, धना भील, लालसिंग भील, जिता भील, देविदास रामगढ, गुमान भील, शिवा भील, युवराज भील, विकास भील, सुरेश भील, मुन्ना भोई, शिव हुकूमसिंग, अशोक भील, नितीन भील, गुमानसिंग भील, सोलाबाई भील, सोनाबाई भील, समाधा भील, प्रमिलाबाई भील, झलाबाई भील, निर्मलबाई भिल, रेखाबाई भील, दुर्गाबाई भील आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जिल्हा परीषद सदस्य वैशाली तायडे, निलेश पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, विलास धायडे, स्वीय सहाय्यक योगेश कोलते उपस्थित होते.