नाडगाव येथील तरुणाचा बंधार्‍यात बुडाल्याने मृत्यू

0

बोदवड- तालुक्यातील नाडगाव येथील तरुणाचा बंधार्‍यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी धडली. शंतनू अनिल पोळ (16) असे मयत तरुणाचे नाव आहे. शंतनू हा शनिवारी दुपारी तीन वाजता आपल्या आई व बहिणीसह हिंगणा गावापुढील मुक्ताईनगर रस्त्यावरील सिमेंटच्या बंधार्‍यावर कपडे धुण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो बंधार्‍यात पडला व गाळात फसल्यामुळे त्याचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना पाहताच नागरीकांनी धावपळ करीत आरडा-ओरड केल्याने त्यास बाहेर काढले असता शरीरात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बोदवड पोलिसात नोंद नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.