नाट्य सादरीकरणातून बेटी बचावचा संदेश

0

भुसावळ । येथील द.शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या नाट्याच्या सादरीकरणातून उपस्थितांना सामाजिक संदेश दिला. प्रारंभी मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटीकेचे सादरीकरण केले. सायमा गवळी, जयश्री इंगळे, ङ्गराना गवळी, प्रज्ञा वाघ, योगिता गायकवाड, सचिन तायडे, गोपाल बोरासी, आदित्य तायडे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या नाटिकेने बेटी बचावचा संदेश दिला.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
सुत्रसंचालन दिलीप ढाके, योगेंद्र चौधरी, वसंत रत्नपारखी, मिलींद तायडे, मिलींद चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
त्याचप्रमाणे प्रियंका सावळे, निकिता अरखेल, नम्रता अरखेल, संजना बोरासी, हर्षा तायडे, ममता दाभाडे, रवीना वानखेडे, स्वाती नरवाडे, जान्हवी बोदवडे, आश्‍विनी नरवाडे, प्रज्ञा बाविस्कर, फराना गवळी, सायमा गवळी, जयश्री इंगळे, प्रज्ञा वाघ, सोनाली सपकाळे, कविता पवार, कोमल निकम, नेहा बोरोले, पल्लवी चौधरी, योगिता गायकवाड, साक्षी साळवे, आकांक्षा इंगळे, दिपाली सोनार, रूपाली भालेराव, प्रियंका सोनवणे, बाली सपकाळे, गोपाल बोरासी, सचिन तायडे, आदित्य तायडे, डिंपल नरवाडे, ऐश्‍वर्या गवळी या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.