नाटकातून उलगडले भवरलालचे जीवन

0

जळगाव : वाकोदसारख्या छोट्या खेड्यातील मुलगा ते विश्वविख्यात जैन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष असे जीवन कार्याचे अत्यंत प्रभावी सादरीकरण अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भवरलालजी जैन यांचे जीवन उलगडून दाखविले. विद्यार्थ्यानी सुमारे अडीच तास नाटकाचे सादरीकरण केले. हर्षल पाटील यांच्या संकल्पनेतून, लेखन व दिग्दर्शनातून जैन यांचे जीवनपट नाटकातून साकारण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 13,14 डिसेंबर रोजी अनुभूती शाळेचा स्थापना दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 13 रोजी सायंकाळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुसील मुन्शी यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलननाने कार्यक्रमाचे उद्घाटन आले. यावेळी दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक डॉ. एच.पी. सिंग, गिमी फरहाद, कविवर्य ना.धों. महानोर, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, प्राचार्य जे.पी. राव उपस्थित होते. नाटकासाठी अनुभूती शाळेच्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

318 विद्यार्थ्याचा नाटकात सहभाग
भवरलाल जैन यांच्या निर्वाणानंतर पहिलाच स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे भाऊंच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रेरणादायी प्रसंग घेऊन केवळ मनोरंजनच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रेरणा घेता यावी या उद्देशाने या नाट्याची निर्मिती करण्यात आली. शेती, माती, पाणी, पर्यावरण या बाबींवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कार्य करणार्‍या भवरलाल जैन यांचा जीवनपट नाटकातुन मांडण्यात आला. नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकुण 318 विद्यार्थ्यानी नाटकात सहभाग घेतले होते.

यांनी साकारल्या भूमिका
मांडणे आव्हानात्मक होते परंतु या नाट्याचे वैशिष्ट्य असे की यात 318 विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग आहे. विशेषतः भवरलाल जैन यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या नाटकात विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनय केल्याचे बघायला मिळाले. नाटकात राधिका राठी (गौराबाईंची भूमिका), नीरज गिरी (दलिचंद जैन), दर्शन चोरडिया (भवरलालजी जैन), शुभम अग्रवाल (राणीदानजी जैन), तनु कांकरिया (कांताबाई) यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे आहे. सहाय्य राहूल निंबाळकर, भाषांतर दिलीप जोशी, रुपांतर अबिरा मिश्रा याशिवाय नैपथ्य तन्मय कुंडू, सचिन राऊत, राम महातो, पार्श्व संगीत निखील क्षीरसागर, अमृतेश मिश्रा आणि तांत्रिक सहाय्य शशिकांत महोनोर यांचे लाभले.