नागरी सेवा स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

जळगांव  – एस.एस.  मणियार विधी महाविद्यालय आयोजित न्यायदंडाधीकारी प्रथम वर्ग आणि नागरी सेवा स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे येथील प्राचार्य डॉ. बहिराम व्ही.वाय. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर,  जयेश आंबोडकर, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयेंद्र लेकूरवाळे यांची प्रमुख उपस्थीती लाभली होती.  प्राचार्य डॉ. बी. युवाकूमार रेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी.आर.क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर, प्रा. अमिता वराडे सहभागी झाले. 
यावेळी न्या. आंबोडकर यांनी न्यायदंडाधीकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी अवश्यक पात्रता, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरुप कसे असते, त्यासाठी संदर्भ ग्रंथ कोणते वापरावे, त्याची तयारी कशी करावी, यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. लेकूरवाळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, स्पर्धा परीक्षा विधी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पुरक असतात हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केले. डॉ. बहिराम यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना विधी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी न्यायदंडाधीकारी प्रथम वर्ग परीक्षेचे महत्व अधोरेखीत करून महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतूक केले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले तर डॉ. सिंग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्पर्धा परीक्षा समिती समन्वयक प्रा. धुमाळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व शेवटी सहभागी मान्यवरांचे आभार मानले.