नागरिकांनो लसीकरणा बाबत सबुरीने घ्या – राजेश टोपे

मुंबईः महाराष्ट्राला लस लगेच उपलब्ध होणार नाहीये, म्हणून १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. अश्या शब्दात महाराष्ट्रात एक मे पासून लसीकरण होणार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषित केले. मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर ते बोलत होते. केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे करोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा खोळंबा झाला आहे.