नागपुरात शिवसेनेला ऑनलाईनचा फटका

0

नागपुर । महापालिका निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता नागपुरात भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत जाणीवपूर्वक ऑनलाईन सर्व्हर डाऊन केला असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. नागपुरात शिवसेना आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत सुरु असतानाच आता तिथे शिवसेनेच्या जवळपास 30 ते 40 उमेदवारांपर्यंत बी फॉर्म न पोहोचल्याने त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजपने जाणीवपूर्वक हा ऑनलाईन सर्व्हर डाऊन केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपविरोधात शिवसेना आता निवडणूक आयोगाकडे तक्रारही करणार आहे.उमेदवारांना अडवण्यासाठी भाजपने हा डाव खेळला याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले कि, आमचे 115 बी फॉर्म पोहोचले आहेत. 15 उमेदवार आम्ही पुरस्कृत केले आहेत. तर भाजपचे 15 उमेदवार शिवसेनेत येणार आहेत. मात्र या सर्वांपर्यंत आमचे बी फॉर्म पोहोचू नयेत, म्हणून भाजपने जाणीवपूर्वक ऑनलाईन सर्व्हर डाऊन केला. त्यांचे उमेदवार शिवसेनेत येऊ नयेत म्हणूनच भाजपने हा डाव खेळला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपचे साटेलोटे असल्याचा संशय
माझ्या वॉर्डात भाजपचे दोन बंडखोर आणि काँग्रेसच्या 2 असे एकूण चार जणांचे अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये भाजपचे साटेलोटे असल्याचा संशय घुगे यांनी व्यक्त केला. पूर्वी प्रत्येक उमेदवार एक पेक्षा कितीही अर्ज भरू शकत होता. चिन्हाच्या अगोदर एबी फॉर्म मिळायचा. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत एबी फॉर्म नसल्याने ही ते अर्ज बाद झाले आहेत. पूर्वी एबी फॉर्म नसल्याने तो उमेदवार अपक्ष निवडणूक लढवू शकत होता. आता मात्र निवडणूक प्रक्रियेतूनच त्याला बाद करण्यात येत. किरकोळ तांत्रीक कारणामुळे आमचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आम्ही पाच वर्षे मागे गेलो आहेात. माझया राजकीय करीअरचे नुकसान झाल्याने त्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे घुगे यांनी सांगितले.

चुक नुसनही अर्ज बाद
पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 126 मधून प्रतिक्षा घुगे यांनी 4 उमेदवारी अर्ज सादर केला होता. यंदा ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरतेवेळी शौचालय पुरावा, थकबाकी नसल्याचा दाखवा, कंत्राटदार नसल्याचा पुरावा, स्थावर व जंगम मालमत्ता अ‍ॅफिडेव्हीड आदी कागदपत्र अपलोड करण्यात आली. इतर प्रिंट आली पण शपथ पत्राची प्रिंट आली नाही म्हणून उमेदवारी अर्ज बाद केला. आमची कोणतीही चूक नाही. ही बाब निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून अर्ज बाद करण्यात आला.

भाजपचा सर्व्हर डाऊनशी संबंध नाही! नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले कि, सर्व्हर डाऊन करण्याशी आमचा काय संबंध? सर्व ठिकाणी सर्व्हर डाऊन होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आमचाही प्रभाग क्र. 17 मधील बी फॉर्म भरला गेला नाही. सेनेने असे आरोप करू नयेत.
– प्रवीण दटके, महापौर, नागपूर

ऑनलाइन प्रक्रिया क्लिष्ट असल्याने व तांत्रिक कारणामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिक्षा धुगे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे ’शपथपत्रा’ची ’प्रिंट’ न आल्यामुळे अर्ज बाद झाला.ऑनलाईन प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती नगरसेविका घुगे यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.
– प्रतिक्षा घुगे,