नागद रोड नविन मार्केट समोरून मोटारसायकल चोरी

0

चाळीसगाव । रात्रीच्या वेळेस घरासमोर लावलेली बजाज प्लॅटीना मोटारसायकल अज्ञात चोरट्याने 27 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास येथील नागद रोड नविन मार्केट समोरून चोरून नेली असून चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहीती अशी शंकर नामदेव वाघ (47) धंदा व्यापार रा. नागद रोड नविन मार्केट समोर चाळीसगांव यांची लाल रंगाची 20 हजार रूपये किमतीची बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्र. एम.एच.19, बी.बी. 2054 ही रात्रीच्या वेळेस त्यांच्या घराबाहेर लावलेली असतांना दि. 27 डिसेंबर 2016 रोजी रात्री 9 ते 28 डिसेंबर 2016 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान अज्ञान चोरट्याने चोरून नेली आहे. शंकर वाघ हे पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर आल्याने त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी मोटारसायकल चा सगळीकडे शोध घेतला. मात्र त्यांना मोटार सायकल मिळून न आल्याने त्यांनी दि. 20 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. आदीनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप तहसीलदार करीत आहेत.