Private Advt

 नऊ महिन्याचं बाळ पोटात असतांना दिले पेपर आणि प्रथम येण्याचा मिळवला बहुमान

जळगाव : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर यांच्या दोन्ही मुलींनी डीएडच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

नांद्रा येथील विनोद आप्पा बाविस्कर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. विनोद बाविस्कर यांच्या मोठ्या मुलींने म्हणजेच दिपाली बाविस्कर हिने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विदयालयात डी.एडला प्रवेश घेतला होता तर, लहान मुलगी रुपाली बाविस्कर हिने म्हसावद येथील शिक्षण शास्त्र विद्यालयात डी.एडला प्रवेश घेतला होता. दोघी बहिनींनी प्रथम वर्षाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेत देखील दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामुळे नांद्रा परिसरासह शिक्षणक्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दीपाली बाविस्कर हिने नऊ महिन्याचे बाळ पोटात असतांना द्वितीय वर्षाचे पेपर दिले असून स्वतः ची प्रसूतीची तारिक अवघ्या काही दिवसांवर असतांना शिक्षणाची जिद्द मनात बाळगून तिने अभ्यास केला. एक मुलगा व कुटुंब सांभाळून दिपलीने मिळविलेल्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.