नांदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य बेपत्ता

0

बोदवड : तालुक्यातील नांदगाव-सोनोटी या ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज भानुदास शिरसाठ (40, रा.नाडगाव, ता.बोदवड)हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने याबाबत त्यांच्या पत्नी सुमित्रा युवराज शिरसाठ यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. युवराज शिरसाठ हे 8 जून रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरून काही कामानिमित्त बाहेर पडले होते मात्र अद्यापपर्यंत ते घरी आले नसल्याचे त्यांच्या पत्नी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. युवराज शिरसाठ यांची उंची पाच फूट असून त्यांनी अंगात भगवा शर्ट, काळी पँट परीधान केली आहे. शिरसाठ यांच्याबात कुणास काही माहिती असल्यास बोदवड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Copy