नांदखुर्दे, फरकांडे व कासोदा रिपाइं फलकाचे अनावरण

0

कासोदा : आजच्या युगात आपले प्रश्‍न मांडले तरी समस्या सुटत नाही. पुढार्‍यांपुढे, अधिकार्‍यांपुढे विनंतीकरूनही आपली समस्या सोडायला ते तयार नाहीत. भिकारी सारखे त्यांच्यापुढे भिक मांगतात, तरी भिक घ्यायला तयार नाहीत. आता भिक मांगणे सोडा व हिसकावून आपल्या पदरी आपली समस्या सोडवा. शिकारी सारखे व्हा. तुम्ही भिकारी नाही शिकारी व्हा असा उपदेश रिपाई (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी कासोदा येथे आयोजित जाहीर सभेत केले.

ते आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की आरपीआय ही झोपडपट्टीत राहणारे गरीबाचा पक्ष आहे हा कोणता एका जातीचा नसून सर्व समाजाचा दिनदुबळ्यांचा पक्ष आहे. घरकुलचे प्रश्‍न, नावे लावण्याचे प्रश्‍न, रेशनिंगचे प्रश्‍न यासाठी आरपीआयतर्फे एरंडोल तालुक्यात जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

फलक अनावरण यांची होती उपस्थिती
यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष एस.डी. खेडकर जळगाव महानगरअध्यक्ष अनिल अडकमोल, विभागीय अध्यक्ष दिपक सपकाळे, जे.डी. भालेराव, तालुका अध्यक्ष प्रविण बाविस्कर यांची भाषणे झाली. प्रारंभी नांदखुर्दे, फरकांडे व कासोदा येथे मान्यवरांचे स्वागत, करण्यात आले. फलकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्याहस्ते करण्यात आले. कासोदा येथील जाहीर सभेत शकीलखान यांनी पक्षात प्रवेश केला. व त्यांना एरंडोल तालुक्यात मुस्लिम अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निजाम बेग, ताहेर अली, राहुल बेहरे, रामू सोनवणे, देवानंद बेहरे, सिताराम मराठे, भिमराव सोनवणे, माया सरदार, धिरज सोनवणे ऋषीकेश पानपाटील, दिपक बाविस्कर, भगवान मराठे आदी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी मन्सुरखा पठाण, जहीरअली, मुश्ताक अली, नाजीम बेग, नुरअली, जहीर शेख, राहुल मोरे, मिलींद मोरे यांनी परिश्रम घेतले.