नशिराबाद हाणामारी प्रकरण; कोठडीत रवानगी 

0
जळगाव- पळून जाऊन प्रेमविवाह केलेले दांपत्य काल नशिराबाद येथे नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यात आल्याचा राग येऊन दोन गटांत सशस्त्र धुमश्‍चक्री उडाली. यात तलवारी, चाकू, कोयत्याचाही वापर झाल्याने सहा जण जखमी झाले होते; तर दोन्ही गटांच्या परस्पर फिर्यादींवरून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
हाणामारी प्रकरणात शेख अफसर शेख रज्जाक (वय-22) याने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, आवेश खान अहमदखान (वय-22),जमीनर खान ऊर्फ जिब्या सत्तार खान (वय-29),तौफीक खान अहमदखान (वय-24) यांनी चाकु, तलवारींचा वापर करीत राहिल खान नासीर खान, रहिनबी साहिलखान, आवेश खान युसूफखान, उमरख यान युसूफ खान याह्या खान सुयूफ खान, युसूफखान गुलाबखान, जयबुनबी हमीदखान यांना जखमी केले होते. जखमींच्या जबाबावरुन संशयीतांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होवुन आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयाने संशयीतांना 15 डीसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
दुसर्‍या गटाचा जामीनासाठी अर्ज 
तक्रारदार तौफीक खान अहमद खान याच्या तक्रारीवरुन फारुख खान हमीद खान, शेख अफसर शेख रज्जाक, रमीज खान रज्जाक खान, सादीक खान रज्जाक खान आदींना अटक करुन न्यायलयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयीतांना न्यायालयीन कोठडीत रवाना केले असुन त्याच्या जामीनावर कामकाज सुरु होते. सरकारपक्षातर्फे ऍड. निखील सुर्यवंशी बचावपक्षातर्फे ऍड.राशिद पिंजारी यांनी कामकाज पाहिले.