Private Advt

नशिराबाद येथे जुन्या वादातून तरूणाला मारहाण

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे जुन्या वादातून तरूणाला दोन जणांनी काठीसह दगडाने मारहाण केली. या प्रकरणी बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी दोन जणांविरूध्द नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून मारहाण
शेख समीर शेख तालीब हा मदिना चौक, नशिराबाद येथे राहतो. मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी घराजवळ कार्यक्रम असल्याने शेख समीर हा त्या ठिकाणी गेला असता तेथे काही लोकांचा वाद सुरू होता. वाद पाहण्यासाठी समीर उभा राहिला. या वाद सुरू असतांना काही लोकांना समीर हा दुसर्‍या गटाकडून असल्याचा गैरसमज झाल्याने त्यातून दोघांनी शेख समीर यास काठीने तसेच दगडाने मारहाण केली. डोक्यात दगड लागल्याने त्यामुळे दुखापत झाली असून समीर जखमी झाला. या प्रकरणी शेख समीर याने दिलेल्या तक्रारीवरून यासीन शाह नूरशाहा व रहिम शाह खलील शाहा या दोघांविरूध्द नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख हे करीत आहेत.