नशिराबाद येथे जनावरे वाहून नेणारे दोन ट्रक पकडले

0

जळगाव : राजस्थानहून मालेगावला 88 जनावरे घेऊन जाणारे दोन ट्रक नशिराबाद पोलिसांनी शनिवारी रात्री 10 वाजता पकडले असून त्यातील सात जनावरे मृत झाली असून तीन अत्यवस्थ स्थितीत आहेत. या सर्व जनावरांना रविवारी पहाटे कुसुंबा येथील अहिंसातीर्थ गोशाळेत आणण्यात आले असून तेथे सर्व जनावरांची काळजी घेतली जात असल्याची माहिती अहिंसातीर्थचे संचालक आर. सी. बाफना यांनी अहिंसातीर्थ गोशाळेत पत्रकारांना दिली. पत्रकारांशी बोलतांना आर.सी. बाफना यांनी बोलतांना गोशाळेत आणल्यानंतर सर्व जनावरांना खायला, प्यायला दिले गेले असून सर्व जनावरांना सामान्य स्थितीत येण्यासाठी दोन तीन दिवस लागतील असे सांगत अत्यंत निर्दयपणे आणले जात असल्याचे सांगत या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने गोहत्या बंदी केली असली तरी गाई वाचवण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे सांगितले. तसेच गायींची वाहतुक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे देखील यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

टोलनाक्याजवळ रचला सापळा
राजस्थान येथून (आर.जे.17 जीए. 2008) व (एम.पी. 14 एनबी. 786) या दोन ट्रकमध्ये भरून 18 गाईचे वासरू आणि 70 गोर्‍हे अशी 88 जनावरे होते. दरम्यान, 81 जनावरे गोशाळेत आता असून त्यात 64 गोर्‍हे आहे तर 17 गायींचे बछडे आहे. यांना मालेगावला नेण्यात येत होते. सर्वांचे पाय बांधलेले होते. तर आवाज करू नये यासाठी त्यांना इंजेक्शन दिल होते. मलमूत्र ट्रकमध्ये करू नये व त्यातून संशय येऊ नये म्हणून त्यांना खायला प्यायला दिलेले नव्हते. शनिवारी सायंकाळी नशिराबाद पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना जनावरांनी भरलेले ट्रक येत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, महाजन,वासुदेव मराठे, गोकुळ तायडे, यूनुस शेख, गुलाब माळी, अनिल पाटील यांनासोबत घेवून रात्री 9 पासून टोलनाक्यावर सापळा लावला. यानंतर टोलनाक्याजवळ रात्री 10 वाजता ट्रक आल्यानंतर दोन्ही ट्रक अडवून ताब्यात घेतले. यात एक बछडा व सहा गोर्‍हे असे सात जनावरे मृतावस्थेत आढळले.

 तीन जनावरांची स्थिती अत्यवस्थ
रात्री नशिराबाद पोलीसांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या माध्यमातून मध्यरात्री सर्व जनावरांना अहिंसा गोशाळेत आणण्यात आले. यानंतर 88 जनावरांपैकी 7 जनावरे मृत असल्याने 81 जनावरांवरांना गोशाळेत आणण्यात आल्यानंतर त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली. त्यात तीन तीन जनावरांची स्थिती अत्यवस्थ असून त्यांचेवर गोशाळेत उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी नशिराबाद पोलीसांनी तीन जणांनासह दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.