Private Advt

नशिराबाद महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत प्रवासी जखमी : कार चालकाविरोधात गुन्हा

जळगाव : रीक्षात बसलेल्या प्रवाशाच्या पायाला कारची धडक बसल्याने प्रवासी जखमी झाल्याची घटना 30 मार्च रोजी घडली होती. जळगाव तालुक्यातील नशिराबाद महामार्गावर ही घटना घडली होती. याप्रकरणी कार चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कार चालकाविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार शेख सईद शेख मजीद (56, रा.नशिराबाद) हे मजूरी करून उदरनिर्वाह करतात. 30 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगावून नशिराबाद येथे येणासाठी रीक्षात बसले. तरसोद फाट्याजवळील टोयोटा शोरूम जवळील राष्ट्रीय महामार्गावरून रीक्षाने जात असतांना त्यांना भरधाव कार क्रमांक (एम.एच.15 ई.ए.1786) ने जोरदार धडक दिली. या धडकेत शेख सईद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शेख सईद शेख मजीद यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने मंगळवारी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गजानन देशमुख करीत आहे.