नशिराबाद जवळ बसची मार्शल गाडीला धडक

0

जळगाव : फैजपुर गावाजळील मारूळ येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमाला आज असलेल्या मार्शल या चारचाकी गाडीला भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या एसटी बसने समोरून जोरदार धडक दिली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळ घडली. या अपघातात मार्शल गाडीतील नऊ जण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर काहींना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

शहरातील मेहरूण परिसरात पिरजादे कुटूंबिय वास्तव्यास आहेत. शुक्रवारी फैजपूर येथील मारूळ येथे नातेवाईकाच्या घरी कार्यक्रम असल्याने पिरजादे कुटूंबिय हे सकाळी मार्शल गाडी क्रं. एमएच.19.एम.0053 ने मारूळसाठी निघाले. राष्ट्रीय महारार्गावरील नशिराबाद टोलनाक्याजवळून जात असतांना एसटी महामंडळची बस क्रं. एमएच.14.बीटी.2080 हि भुसावळकडून जळगावकडे येत असतांना पिरजादे यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबर होती की चक्क मार्शल गाडी ही रस्त्याच्या खाली उतरून शेतात अडकली. महामार्गावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना अपघात घडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून गाडीतील जखमींना बाहेर काढले. यात पुरूषांवसह महिला व बालिका गंभीर जखमी झाले होते. यावेळी महामार्गावरून ये-जा करणार्‍यांनी चांगलीच गर्दी केली होती. यामुळे महार्गावर वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागून वाहतुक विस्कळीत झाली. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले. परंतू गंभीर जखमी असलेल्यांना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले.

 हे आहेत जखमी
एसटीने चारचाकी गाडीला दिलेल्या घडकेत अझरूद्दीन मझरूद्दीन पिरजादे (वय-40), मझरूद्दीन अहमुद्दीन पिरजादे (वय-65), हसीन कौसर अझरूद्दीन पिरजादे (वय-35), सायरा खातून नुसरतूद्दीन (वय-30), नुरझहा अब्दूल रहेमान (वय-30), नुर अझरूद्दीन (वय-30), नाझीमा नुसरुद्दीन (वय-06), बीबीबतूल मोहम्मद जाहिद (वय-32), मोहम्मद आशिक अझरूद्दीन पिरजादे (वय-19) हे गंभीर जमखी झाले आहेत. यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात मार्शल गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जिवीत हानी टळली.