Private Advt

नशिराबादमधील बंद घर फोडत 73 हजारांचा ऐवज लांबवला

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून 73 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी
हेमंत रामलाल चौबे (68, ग्रामपंचायतीजवळ, नशिराबाद) हे काही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी 6 ते 8 मे दरम्यान गेल्यानंतर चोरट्यांनी बंद घर पाहून संधी साधली. घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याचे-चांदीचे दागिने व रोकड मिळून एकूण 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. 8 मे रोजी हेमंत चौबे रात्री घरी आले असता त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी सोमवार, 9 मे रोजी दुपारी दोन वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.