नवीपेठेतून प्रौढाच्या पिशवीतून २५ हजार लांबविले

जळगाव । नवीपेठेतील बँक ऑफ बडोदा व बेंडाळे चौकादरम्यान एका जणाच्या पिशवीतून २५ हजार रुपये चोरट्याने मंगळवारी दुपारी लांबविले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक सांडू काळे (रा. विवेकानंदनगर, केमिस्ट भवन) हे नवीपेठेतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत १ जून रोजी दुपारी १ वाजता आले. काम ओटापून घरी जात असताना बँक ऑफ बडोदा ते बेंडाळे चौक दरम्यान त्यांच्या पिशवीतून २५ हजार रपये लंपास केले. याबाबत अशोक काळे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल किशोर निकुंभ करीत आहेत.

Copy