नवीन वर्षात बहुजन क्रांती तर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन

0

जळगाव : शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्या प्रचार जनजागृतीसाठी 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वा मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोेटार सायकल रॅली रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन प्रारंभ होणाार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष भैय्या ठंढोरे, चर्मकार समाजाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास विसावे, चंद्रकांत सोनवणे, ईश्‍वर मोरे, सुखराम भील, माजी महापौर करीम सालार, गोपाळ ठाकुर, किशोर सुर्यवंशी, सुरेश अंभोरे, बाळासाहेब सैदांणे, शिवाजी पाटील, अशफाक पिंजारी, महेमुद खान, प्रताप महाजन, जे.डी.ठाकरे इत्यादी उपस्थित राहणार आहेत.यावेळी मान्यवरांतर्फे रॅलीस झेडे दाखवुन सुरवात करण्यात येणार आहे रॅलीत एकतेचा संदेश देत रॅली जळगाव शहरात फीरणार असल्याचे संयोजक मुकू ंद सपकाळे यांनी सांगितले.