नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मागविले अर्ज

0

धुळे : सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून कायमस्वरुपी विना अनुदान तत्वावर खालील प्रकारचे नवीन अभ्यासक्रम, नवीन अधिकच्या तुकडया सुरु करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धुळे यांनी दिली आहे. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम + २ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम + २ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम. या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था, वाढीव तुकड्या सुरु करु इच्छिणाऱ्या पंजीकृत व आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या शैक्षणिक संस्थाकडून १५ फेब्रुवारी २०१७ पासून विहित नमून्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छूक संस्थांकडे संबंधित अभ्यासक्रमासाठी मानंकानुसार आवश्यक सुविधा आणि साधन सामुग्री प्रत्यक्षात उपलब्ध आहे किंवा यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आहे अशा संस्थांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व विहीत मार्गदर्शक सूचना व कालबध्द कार्यक्रमानुसार कार्यवाही करावी असे एस.एम.हस्ते संचालक व्यवसाय शिक्षण मुंबई यांनी कळविले आहे. अर्ज करतांना ३ प्रतीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडे १५ मार्च, २०१७ पर्यंत विहित शुल्क भरुन सादर करावे. त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत विलंब शुल्क आकारुन अर्ज सादर करता येतील, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.