नवापूर शहरात ४६ वाहनांवर दंडात्मक कारवाई

0

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात पहिला कोरोना रूग्ण वाढल्यानंतर पोलिसांकडून नवापूर शहर सील करण्यात आले आहे.आज ४६ दुचाकी वाहनांवर कारवाई करुन त्यांना सोडुन देण्यात आले. तसेच शहरात १२ ठिकाणी रस्ते सील करण्यात आले आहेत.

शहरात येण्यासाठी काॅलेज जवळील एक रस्ता, दुसरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता ठेवला आहे. सार्वजनिक मराठी हायस्कूल जवळील रस्ता, शेतक-यांचा पीक मालाच्या गाड्या भाजीपालाच्या गाड्या, रूग्णावहिका, पोलिस वाहन यांचाच प्रवेश राहणार आहे. अन्य सर्व खाजगी वाहने मोटरसायकली जाऊ शकणार नाहीत.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ पोलिस उभे राहुन मोटरसायकलीवर विनाकारण फिरणार्या मोटरसायकली पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या. सकाळ पासुन पोलिस निरीक्षक विजयसिग राजपूत,सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन,पो का निजाम पाडवी,विकास पाटील,प्रशात यादव,कृष्णा पवार,योगेश साळवे,जयेस बाविस्कर,दिनेश बाविस्कर,प्रविण मोरे हे आज दुचाकी व रिक्षा वाहनावर कार्यवाही करतांना दिसत होते.

या कारवाईमुळे संचारबंदीत फिरणार्याना मोठी चपराक बसली असुन पोलीसी खाक्या दाखविल्यामुळे अनेकांनी धसका घेत घरातच राहणे पसंद केले आहे. नवापूर जास्तच कडक करण्यात आल्याने अनेकांची पंचायत झाली आहे

Copy