नवापूर शहरात बेशिस्त वाहतूकीमुळे रहदारीचा उडाला बोजवरा

0

नवापूर (हेमंत पाटील)। शहरातील मेनरोड व मुख्य बाजारपेठ भागात जडवाहने, लॉरीवाले, बेशिस्त वाहने यामुळे वाहतूकीचे वारंवार कोंडी होत आहे. काही महिन्यापुर्वी नगर पालिकेने बॅरीकेटस लावून जड वाहनांना प्रवेश बंदी केली होती. तसेच मागच्या वर्षी पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली होती. मात्र बॅरीकेटसला वाहनाने ठोस देऊन ते तोडून टाकले होते. त्यानंतर जडवाहने शहरात पुन्हा येऊ लागली आहेत. ही मोहीम बंद होताच पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. मुख्य बाजारपेठ व मेन रोड हा रस्ता अरुंद व एकेरी आहे. यातच काही दुकानदार माल व इतर वस्तू दुकानांपुढे हातगाड्या लावून वाहतुकीची कोंडी करत आहेत.

महानगरपालिकेने वाहनतळ उभारावे
मेनरोड व बाजारपेठ, गढी परिसर भागात माल देण्यासाठी जड वाहने येतात ती रस्त्यावरच तासनतास माल उतरवत असतात. यामुळे देखील वाहतूकीचे कोंडी होत आहे. शहराती विविध भागात नागरिक मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात यावर उपाय म्हणून पालिकेने ठिकाणी ठिकाणी मोकळ्या जागांवर वाहनतळ उभारणे गरजेचे आहे. पे अ‍ॅण्ड पार्क या धर्तीवर नगर पालिकेने वाहनतळ उभारल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहनधारकांची सोय होऊन पालिकेचा उत्पन्नात वाढ होणार आहे.

वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष
शहराचा विस्तार व वाहनांची संख्या बघता रहदारी वाढली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मेनरोड,लाईट बाजार याठिकाणी वाहतूक पोलीस नेमले आहेत. पण गढी परिसर, मच्छी मार्कट, नारायण पुर रोड, लिमडावाडी या भागात पोलीस नेमणूक केल्याचे दिसून येते नाही. तसेच जेथे संबंधीत पोलीसांची नेमणूक केली आहे ते त्याठिकाणी थांबत नसल्याने वाहतूकीचा बोजवारा उडतो.

वाहनधारकांना शिस्त लावा
शहरातील बेशिस्त वाहतूक समस्या गंभीर झाली आहे त्याकडे पोलीस व नगर पालिकेचे दुर्लक्ष आहे. शहरात जिल्हाधिकारी आले होते तेव्हा त्यांनी ही बेशस्त वाहने व ट्राफिक समस्या पाहून तीव्र नाराजी व्यक्त करून सूचना दिल्या होत्या तरी ही परिस्थिती जैसे थे आहे. बेशिस्त वाहतूकीची समस्या सोडवून वाहनधारकांना शिस्त लावण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.